नगर: धुडगूस घातल्याप्रकरणी भाजप आमदार कर्डिलेंना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

या गुन्ह्यातील दादाभाऊ कळमकर, सचिन अरूण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखील वारे यांच्यासह अन्य आरोपी पसार आहेत.

नगर : आमदार संग्राम जगताप यांना केडगाव येथील दुहेरी खून प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना आज (सोमवार) सकाळी अटक करण्यात आली.

या गुन्ह्यात कैलास रामभाऊ गिरवले, शरीफ राजू शेख, राहुल अरूण चिंतामणी, प्रसन्न मनोहर जोशी, सय्यद अर्शिद अकबर, आवेश जब्बार शेख, सय्यद जाएद असिफ, सागर मच्छिंद्र वाव्हळ, संजय मधुकर वाल्हेकर, अनिल रमेश राऊत, अनिकेत बाळासाहेब चव्हाण, अनिकेत बाळासाहेब चव्हाण, गिरीष ुसभाषराव गायकवाड, दिपक रामचंद्र घोडेकर, रियाज रमजान तांबोळी, दत्ता सखाराम उगले, कुणाल सुभाष घोलप, साईनाथ यादव लोखंडे, सचिन रामदास गवळीस सोमनाथ भाऊसाहेब गाडळकर, संतोष लहानु सूर्यवंशी, धर्मा त्रिंबक करांडे, इर्मान जानसाब शेख हे पोलिस कोठडीत आहेत. आज सकाळी पोलिस भिंगार परिसरात आमदार शिवाजी कर्डिले यांना ताब्यात घेतले. मात्र, कर्डिले स्वतः हजर झाल्याची चर्चा आहे.

या गुन्ह्यातील दादाभाऊ कळमकर, सचिन अरूण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखील वारे यांच्यासह अन्य आरोपी पसार आहेत.

Web Title: BJP MLA Shivaji Kardile arrested in Nagar case