भाजप स्वच्छ नेत्यांची पार्टी नाही - पतंगराव कदम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कडेगाव - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे राज्याच्या ग्रामीण भागाची चाचणी होणार आहे. ग्रामीण भागात कोण नंबर वन, हे याच निवडणुकीत स्पष्ट होईल. त्यामुळे भाजपने पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे. येतील त्यांना पक्षात समावून घेत आहेत. त्यात गुंडांनाही प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे भाजप स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांची पार्टी, असे आता म्हणता येणार नाही, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

कदम म्हणाले, "जिल्ह्यात भाजप व शिवसेना वगळून कॉंग्रेसने इतर पक्षांशी आघाडी केली आहे. कडेगाव, पलूस व जत तालुक्‍यांत कॉंग्रेस स्वबळावर लढत आहे. जिल्ह्यात इतर तालुक्‍यांत आघाडी केलेली आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसला चांगले वातावरण आहे. सामान्यांची नाळ कॉंग्रेसशी जोडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत कॉंग्रेसला निश्‍चित यश मिळेल, याची खात्री आहे. नाराज कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढले आहेत.'' ते म्हणाले, ""मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकारणावरून शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर सुरू केलेली चिखलफेक पाहता राज्यात गोंधळाचे वातावरण आहे. मुंबई महापालिका सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.'' 

Web Title: BJP party leaders not clean