सांगली : ‘एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊनच महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांना सामोरे जा,’ असे स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिले आहेत. .त्यामुळे सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत युतीबाबत सकारात्मक चर्चा करत आहेत. सांगलीत तिढा नाही, मात्र मिरजेत घोडं अडलं आहे. मिरजेत आमदार सुरेश खाडे भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्या विरोधात शड्डू ठोकून आव्हान देणारे मोहन वनखंडे आता शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत. .Jalgaon Municipal Election : भाजपला पराभवाची भीती; म्हणून आमचे 'विजयी उमेदवार' फोडले: संजय सावंत यांचा हल्लाबोल.त्यांच्यात एकमत होण्याची शक्यता कमी असल्याने चर्चेचे घोडे अडले आहे.महापालिका निवडणुकीत भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, रिपाइं, रयत आघाडी अशी युती होईल, अशी शक्यता होती. त्यातून राष्ट्रवादीची वजाबाकी जवळपास निश्चित मानली जात आहे. अशावेळी भाजपला शिवसेना सोबत हवी आहे..शिवाय, दिल्लीतून तसाच निरोप आला असल्याने त्याबाबत भाजप नेत्यांकडे किंतु-परंतु करण्याची संधीच उरलेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नेते, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर हेही चर्चेत सहभागी आहेत. .Nashik Election Results 2025 : नाशिकमध्ये महायुतीचा गुलाल! ११ पैकी ८ नगरपालिकांवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व, मविआचा सुपडा साफ.शिवसेनेने मिरजेत नऊ आणि सांगलीत नऊ अशा एकूण अठरा जागांची युतीत मागणी केली आहे. त्यांना किती जागा दिल्या जातात, याकडे लक्ष असणार आहे. नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने विटा नगरपालिका आणि शिराळा नगरपंचायतीवर भगवा फडकावला. शिवसेना तब्बल ३४ जागांवर जिंकली..या पक्षाने एक कमी भाजपइतक्या जागा जिंकत धक्कादायक कामगिरी केली. परिणामी, पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या स्थितीत भाजपच्या बहुतांश नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याचा फायदा होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगलीबाबत फारशी अडचण राहिलेली नाही. .मात्र मिरजेत आमदार सुरेश खाडे आणि शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांच्यात संघर्ष सुरू आहे. वनखंडे एकेकाळी खाडे यांचे अत्यंत विश्वासू होते. त्यांच्यात वितुष्ट आले. वनखंडे यांनी भाजपला रामराम ठोकला, काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ते शिंदेंच्या शिवसेनेत आले आहेत. .मिरजेत ते नक्कीच चांगली मांडणी करू शकतात. त्यांचे चिरंजीव सागर हे मिरजेतून लढणार आहेत. त्यांना सुरेश खाडे यांचे चिरंजीव सुशांत आव्हान देतील आणि युतीतच लढाई होईल, अशी चर्चादेखील रंगलेली आहे. .शिवसेनेकडे सांगली आणि मिरजेत काही प्रभावी चेहरे आहेत. त्या ‘शिंदे पॅटर्न’मुळे बळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने निवडणूक उभी करतात, त्यामुळे अनेकजण प्रभावीत झाले आहेत. त्यांच्याकडून उमेदवारांना मोठी ‘ताकद’ आणि ‘रसद’ दिली जाते. त्यामुळे भलेभले गारद होतात, हे नगरपालिका निवडणुकीत दिसले आहे. .परिणामी, अनेक चेहरे शिवसेनेकडून लढायला इच्छुक आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची सांगलीत काँग्रेस कमिटीसमोर सभा झाली होती. यावेळी त्यांच्या नेतृत्वात सेना लढणार आहे. .त्यामुळे ते पुन्हा प्रचाराला येतील, असा विश्वास त्यांच्या पक्षाला वाटतो आहे. त युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील यांच्या पत्नी साक्षी बोरगावे यांनी प्रभाग सतरा मधून दावा केला आहे. भाजप ही जागा सेनेला देऊ शकते. याशिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक असलेल्या काही प्रभागांमध्ये ‘कमळ’ ऐवजी ‘धनुष्यबाण’ चालवला जावा, असा प्रयोग केला जाऊ शकतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.