Loksabha 2019 : माढा, बारामतीसह महायुती 40 जागा जिंकेल : महादेव जानकर

भारत नागणे
शनिवार, 4 मे 2019

राज्यातील लोकसभेचा निकाल काय असेल असे विचारले असता, माढा, बारामती आणि सांगलीसह किमान 40 जागा भाजप शिवसेना जिंकेल, असा आत्मविश्वास देखील जानकर यांनी व्यक्त केला.

पंढरपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी तिजोरी खाली करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगत माढा, बारामती आणी सांगलीसह राज्यात महायुती 40 जागा जिंकेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज व्यक्त केला.

दुष्काळी पहाणी दौऱ्याच्या निमित्ताने आज मंत्री जानकर यांनी सांगोला तालुक्यातील घेरडी येथील जनावरांच्या छावणीला भेट देऊन येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राज्यात एकूण 1 कोटी 12 लाख पशुधन आहे .दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने आतापर्यंत 1 हजार 248 जनावरांच्या छावण्या सुरू केल्यात आहेत. यामध्ये 8 लाख जनावारांची चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात सांगोला तालुक्यात सर्वाधिक 77 छावण्या सुरू असून त्यामध्ये 77 हजार जनावरे दाखल झाली आहेत.

पशु पालकांच्या मागणीनुसार प्रती जनावर॔ 15 ऐवजी आता 18 किलो चारा देण्यात येणार आहे. तर जनावरांना बॅच मारण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतलेले सहा रूपये देखील परत करण्यात येणार आहेत. या शिवाय जनावरांचा विमा पाॅलिसी देखील सरकार काढणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले.

राज्यातील लोकसभेचा निकाल काय असेल असे विचारले असता, माढा, बारामती आणि सांगलीसह किमान 40 जागा भाजप शिवसेना जिंकेल, असा आत्मविश्वास देखील जानकर यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Shivsena alliance wins 40 seats in Maharashtara says Mahadev Jankar