
सांगलीत राजकीय खळबळ! भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितले, “जागा उरल्या तरच मित्रपक्षांचा विचार होईल.”
esakal
Sangli BJP Politics : ‘‘महापालिकेत मागील निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या व आतापर्यंत ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि भविष्यात भाजपमध्ये येणाऱ्या सर्व तत्कालीन नगरसेवकांना आगामी निवडणुकीत पुन्हा उमेदवारी देऊया,’’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे जाहीर केले. त्यांनी दिवाळीनिमित्त जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्ष व भाजप नेत्या जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित कदम उपस्थित होते.