esakal | गली गली मे शोऱ है...राहुल गांधी चोर है ; भाजपाचे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

BJP's Agitation In Karad Against Rahul Gandhi

राफेलबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोपात तथ्य आढळले नसल्याने भाजपने राहूल गांधींचा निषेध व्यक्त केला.

गली गली मे शोऱ है...राहुल गांधी चोर है ; भाजपाचे आंदोलन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : गली गली मे शोऱ है... राहुल गांधी चोर है..., चौकीदार प्युअर है... राहुल गांधी चोर है... अशा घोषणा देत राफेलबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोप केले. मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी, अशी मागणी येथील भारतीय जनता पक्षाने आंदाेलन करुन केले.

माहिती घेऊन उत्तर देणार : विक्रम पावसकर

जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे घोषणाबाजी करत राहूल गांधी यांचा निषेध नाेंदविला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनास नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, घनश्‍याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, प्रशांत कुलकर्णी, नितीन वास्के, उमेश शिंदे, रुपेश मुळे, प्रमोद शिंदे, राहुल भिसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यांना खाली खेचा आणि ठेचा ः उदयनराजे 

loading image
go to top