का होत नाही काळ्या दिनात सहभागी झालेल्यावर गुन्हा दाखल...?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

राज्य सीमा व जल आयोग, प्रशासन आणि विविध कन्नड संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सीमाप्रश्‍न व इतर विषयवार चर्चा झाली.

बेळगाव : काळ्या दिनात सहभागी होत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही. अशी चफराक मराठी भाषिकांवर कारवाई करणाऱ्या कन्नड संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना राज्य सीमा व जल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायामूर्ती मंजुनाथ लगावली. सीमाप्रश्‍ना बाबत कोणताही नेता काही बोलला म्हणून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका न्यायालयात दाखल करणे चुकीचे ठरते. सध्या प्रश्‍न कोर्टात आहे. त्यामुळे आपल्याला अडचण येऊ शकते. मात्र, याबाबत न्यायालयाकडे अंतरिम अर्ज दाखल करू शकतो. त्यासाठी सरकारकडे शिफारस करू, असे आश्‍वासन निवृत्त न्यायामूर्ती मंजुनाथ यांनी सोमावारी (ता.3) विविध कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

राज्य सीमा व जल आयोग, प्रशासन आणि विविध कन्नड संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सीमाप्रश्‍न व इतर विषयवार चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती मंजुनाथ होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मन्नहळ्ळी, ऍड. एम. बी. जिर्ली, पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निबरगी आदी अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा- बापरे : या शहरात सापडले इतके टन प्लस्टिक

मराठी भाषिकांची संख्या कमी
प्रारंभी श्री. मंजुनाथ म्हणाले, सीमाप्रश्‍नाबाबत न्यायालयात आपली बाजू भक्कम आहे. त्याप्रकारचे पुरावे आहे. ज्या तत्वावर बेळगावर आपला हक्क असल्याचा दावा न्यायालयात महाराष्ट्राने दाखल केला आहे. त्यानुसार दावा टिकणार नाही. 1956 नुसार सीमाभागातील भाषिकांची आकडेवारी पाहिल्या मराठी भाषिकांची संख्या कमी झाली आहे. तर कन्नड भाषिकांचा टक्का वाढलेला आहे. भाषिक अल्पसंख्याक कायदानुसार महाराष्ट्र 70 टक्‍क्‍याहून अधिक मराठी भाषिक सीमाभागात असल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्ष गणती पाहिल्यास सर्व फोल ठरणार आहे. त्यामुळे न्यायालयात आपली बाजू भक्कम आहे. त्यामुळे कोणतीच काळजी करू नका. 

हेही वाचा- पारेकरवाडीत घडली एवढी मोठी घटना मात्र लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत...

बेळगावात सुवर्णसौध

यावेळी कन्नड संघटनाचे पदाधिकारी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्‍नासाठी दोन समन्वयक मंत्र्यांची नेमणुक केली आहे. पण, आपल्या सरकारकडून प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर आयोक बंगळूरातून काम चालवत आहे. बेळगावात सुवर्णसौध उभारण्यात आली असून याठिकाणी आयोगाचे कार्यालय सुरू करावे.महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊन सीमाप्रश्‍नावर भाष्य करत आहे. आपल्या राज्यात येऊन अरेरावीची भाषा करत आहेत. येथील मराठी संघटनाकडून कर्नाटकाच्या विरोधात कारवाई करत आहेत. यांच्यावर कायदेशीर गुन्हा का दाखल केला जात नाही. बेळगावात आलेल्या मराहाराष्ट्रातील नेत्यांवर अवमान याचिका का दाखल केली जात नाही. काळा दिन पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी केली. 

हेही वाचा- त्या मारेकऱ्यांना मृत्यूदंड झालाच पाहिजे....

राज्योत्सवाच्या आड आल्यास गुन्हा दाखल

यावेळी श्री. मंजूनाथ म्हणाले, काळा दिन त्यांनी आपल्या परीने पाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही. मात्र, त्यांनी राज्योत्सवाच्या आड आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतात. महाराष्ट्रातील नेते याठिकाणी आल्यामुळे अवमान याचिका दाखल केली तर आपल्याला अधिक अडचण आहे. खटला चाविण्यास पुन्हा उशिर होणार. त्यामुळे त्यांनी काही करूदेत आपली बाजू भक्कम असून न्यायालयीन लढा लढण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करूया. असे कन्नड भाषिक संघटानाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Day In Karnataka Marathi News