पंचगंगा प्रदूषणामुळे नदीकाठावरील गावांना काळ्या पाण्याची शिक्षा : धैर्यशील माने

राजेंद्र होळकर
शनिवार, 9 जून 2018

इचलकरंजी : कोल्हापूर, इचलकरंजी यासारख्या मोठ्या शहरांमधील सांडपाणी,औद्योगिक कारखाने, वसाहतींमधील रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने त्याची गटारगंगा बनली आहे आणि यामुळेच नदीकाठावरील गावातील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.याविरोधातील लोकलढा आता व्यापक बनत असून तो शासनाला धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा पंचगंगा नदी बचाव कृती समितीचे समन्वयक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी दिला.

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्यावतीने सुरु असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाच्या नवव्या दिवशी शनिवारी रुई (हातकणंगले) येथे गावबंद आणि लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त सभेत ते बोलत होते. रुई ग्रामपंचायत आणि सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आयोजित आंदोलनास माजी आमदार राजीव आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनामुळे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष कुमार खूळ, राजाराम साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब मकुभाई, जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम, पंचायत समितीचे सदस्य अजीम मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल कांबळे, वडगाव बाजार समितीचे अध्यक्ष संजय मगदूम, माजी जिल्हा परीषद सदस्य बबलू मकानदार, डॉ.अविनाश सावर्डेकर, सरपंच सौ.तनुजा सरोदे, उपसरपंच सुभाष चौगुले, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार साठे, कर्मवीर मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब हुपरे, तुकाराम भोसले, माजी उपसरपंच महावीर हुल्ले, रामचंद्र परीट, ग्रामपंचायत सदस्य संतोष साळुंखे, प्रा.जयकुमार बलवान आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी जवाहर साखर कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब मुरचिट्टे, ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे, डॉ. सुधीर भोकरे, पद्मन्ना हेरवाडे, रुई विकास सोसायटीचे अध्यक्ष कल्लाप्पा बेनाडे, पांडुरंग जाधव, सर्जेराव पाटणकर, आनंदा झपाटे, सुभाष पाटणकर, अनिल जाधव, हरिबा साठे, दगडू सुर्वे, सदाशिव अपराध, सदाशिव झपाटे, जयपाल माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कुमार जगोजे, सुनील वडगावे, विनोद मूरचिट्टे, अशोक साठे,जहांगीर मुजावर, बाबासाहेब कागले,सागर खाडे, अवधूत पाटील, ग्रामपंचायत सदस्या स्वप्ना काश्मिरे, सारिका मगदूम, सौ. बेनाडे, माजी सरपंच अनिता कुंभार रुकडीचे सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच शितल खोत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: black water punishment to villages near panchganaga for pollution said dhairyashil mane