सुप्यातील कंपनीत स्फोट, सहा कामगार भाजले 

सुप्यातील कंपनीत स्फोट, सहा कामगार भाजले 

पारनेर - सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये टायरपासून फर्निस ऑइल तयार करण्यात येणाऱ्या शुभम इंडस्ट्रीत आज (ता.8) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यात सहा कामगार भाजून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

जखमींना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
 या बाबत माहिती अशी की, सुपे औद्योगिक वसाहतीत सकाळी काम सुरू केल्यानंतर काही वेळातच या कारखान्यात स्फोट झाला. त्यात सहा कर्मचारी जखमी झाले. सर्व कामगार राज्याबाहेरील असल्याने त्यांची नावे उपलब्ध झाली नाहीत. त्यातील चार जखमींना सुपे येथील हॉस्पिटलमध्ये, तर दोघांना नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

स्फोटाचे कारण मात्र समजू शकले नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com