मंगळवेढा : फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये स्फोट

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा तालुक्यातील भाळवणी येथील फटाके तयार करणाऱ्या सागर फायर वर्क्स या फटाके कारखान्याच्या गोडाऊनमध्ये आज सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान स्फोट होऊन कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की, शेजारील दहा किलोमीटर अंतरावर याचा आवाज ऐकून गेला. त्यामुळे या मोठ्या आवाजामुळे या परिसरातील मोबाईल धारकांकडून आवाज कशाचा याबाबत मोबाईलवर विचारणा होत होती.

दरम्यान यामध्ये जीवितहानी झाली नसल्याचे समजते. दक्षिण भागांमध्ये मजुरांना रोजगाराचे कोणतेही साधन नसल्यामुळे स्थानिक व परराज्यातील कामगारांना या धोकादायक व्यवसायात काम करावे लागत आहे. थोड्या वेळानंतर नुकसानीची आकडा स्पष्ट होणार आहे. स्फोटाच्या आवाजाने गोडाऊन सह लगतच्या काही घरांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com