couple
couple

विहाळमधील अंध दांपत्याची डोळस प्रेमकहाणी

करमाळा (सोलापूर) : प्रेम अंधळ असतं असे सर्वच सांगतात पण दोन अंध एकमेकांच्या प्रेमात पडुन स्वतःच्या पायावर संसार उभा करतात यांचे मुर्तीमंत उदाहरण आपल्याला विहाळ (ता.करमाळा )येथे मारूती केरबा
सायकर व गौरी सायकर यांच्या रूपाने पहायाला मिळेल.

सध्या या दामपत्यांनी विहाळ येथे नाॅचरो थेरपी (निसर्ग उपचार )आणि अॅक्यु प्रेशर केंद्र सुरू केले असुन करमाळा तालुक्या बरोबरच इतर ठिकाणाहुन अनेक लोक उपचारासाठी येत आहेत.रूग्णांना चांगला गुण येत आहे.दोघेही अंध असुन मोठ्या जिद्दीने संसार उभा करण्याचा त्यांची धडपड पाहुन सर्वच जण कैतुक करत आहेत. 

मारूती सायकर हा अंत्यत गरीब कुठुंबात जन्माला. आई -वडिलांनी मंजुरी करून तीन मुली व एक मुलगा वाढवला.मारूतीला जन्मापासूनच दिसायला कमी होते.

मारूती केरबा सायकर याला 2008 पासुन दिसने पुर्णपणे बंद झाले.2008 नंतर माञ तो पुर्णपणे दिसेनासे झाले.मारूतीचे 10 वी पर्यंत शिक्षण झाले आहे.अचानक दिसणे बंद झाले.आता पुढे काय हा प्रश्न आई - वडिलांपुढे 
आ वासून उभा राहीला.तरीही मारूती डगमगला नाही. त्यांने पुणे येथिल नाॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नाॅचरो थेरपी महाविद्यालयात एक वर्षाचा नाॅचरो थेरपी निसर्ग उपचार आणि अॅकोप्रशेर चा कोर्स पुर्ण केला.वडीलांचे निधन झाल्यानंतर आईने मंजुरी करून त्याला शिकवले.

महाबळेश्वर येथे कॅन्डल बनवण्याच्या कंपनीत काम करत असताना मारूतीची ओळख नाशिकच्या गौरी जाधव बरोबर झाली.गौरी ही पुर्णपणे अंध आहे.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले ,नंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांचा अंतरजातीय विवाह आहे.योग्ययोग म्हणजे गौरीनेही नाॅचरो थेरपी निसर्ग उपचार आणि अॅकोप्रशेर हा कोर्स केला होता.लग्नानंतर दोघांनाही जोमाने संसार करायचे ठरवले.त्यानंतर दोघांनीही मलकापूर (जि.बुलढाणा) येथे नाॅचरो थेरपी निसर्ग उपचार आणि अॅकोप्रशेर उपचार केंद्रात काम सुरू केले.दोन वर्ष दोघांनीही येथे काम केले.येथे दोघांना मिळुन 12 हजार रूपये मिळायचे .दोन वर्षे येथे काम केले.लोंकाना चांगला गुण येत आहे हे लक्षात आल्याने दोंघांचाही आत्मविश्वास वाढला.त्यातूनच आपल्या मुळ गावी विहाळ येथे त्यांनी उपचार केंद्र सुरू केले आहे. (अधिक संपर्कासाठी मारूती सायकर यांचा मोबाईल नंबर 9767293521)

मी दोन वर्षापासुन उपचार करून दमुन गेलो होतो. मात्र कसलाच फरक पडत नव्हता.मला विहाळला कुणी तरी उपचार करत असल्याचे सांगितले. गेली एक महीन्यापासुन उपचार घेत आहे.मला चांगला फरक पडला आहे. हे दोघे नवरा बायको अंध असुनही त्यांची धडपड खुप चांगली आहे.
- बाळु एकनाथ भराटे, सावडी, ता.करमाळा जि.सोलापुर 

आम्ही पाच बहिणी एक भाऊ असे कुंठुब आहे. मी अंध आहे .असाच प्राॅब्लेम माझ्या दोन बहिणींना आहे.आम्ही अंध असलो तरी आम्हाला ही भावना आहेत.निसर्ग उपचार व अॅकोप्रशेर चा उपचार आम्ही करतो.मलकापुर येथे मिळालेले पैसे साठवून स्वतःचे उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आमचा छोटासा प्रयत्न आहे.अनेक रूग्णांना फरक पडला आहे.
- गौरी मारूती सायकर., विहाळ, ता.करमाळा, जि.सोलापूर 

अंध मुलगा असणे यांचे दुःख काय असते ते कसे सांगु? मारूतीचे कसे होणार असे आम्हाला वाटायचे.तरीपण तो आम्हाला धीर देयचा. त्यातुनच तो हे उपचार करायचे शिकला.त्यांचे लग्नही झाले आहे,आजही आम्ही सर्वजणं खुप कष्ट करतो.
नंदाबाई सायकर, आई.विहाळ. 

यावर होतो उपचार..
मनक्यात गॅप, नस दबणे, पॅरालिसेस, घुडगे दुखी, मान दुखी, सांधे दुखी यावर उपचार केला जातो.यासाठी लागणा-या मशनरी उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com