लाच घेताना शाहूवाडीची गटशिक्षणाधिकारी जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

कोल्हापूर / शाहूवाडी - शिक्षकांचे सेवापुस्तक देण्यासाठी सहा हजाराची लाच घेताना शाहूवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले; तर अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपिकालाही ताब्यात घेतले. गटशिक्षणाधिकारी प्रतिभा शिवाजीराव सुर्वे (वय 57, मंगळवार पेठ, कोल्हापूर) व कनिष्ठ लिपिक नितीन नाथा राबाडे (27, रा. खुटाळवाडी, शाहूवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

तक्रारदार यांची पत्नी दहा वर्षांपासून मोळवडे (ता. शाहूवाडी) येथे शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत होत्या. त्यांच्या विनंतीवरून त्यांची नंदूरबार जिल्हा परिषद येथे बदली झाली. तसेच त्यांची मेहुणी परळे (ता. शाहूवाडी) येथे शिक्षिका होत्या. त्यांचीही विनंतीनुसार धुळे जिल्हा परिषद येथे बदली झाली. मात्र या दोघींचीही सेवापुस्तक व अंतिम वेतन प्रमाणपत्र बदलीच्या ठिकाणी पाठविले नव्हते. त्यामुळे त्यांचे बदलीच्या ठिकाणी वेतन निघाले नव्हते. याबाबत तक्रारदारांनी 13 जुलैला शाहूवाडी पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी प्रतिभा सुर्वेची भेट घेतली. तिने पत्नी व मेहुणीचे सेवापुस्तक देण्यासाठी प्रत्येकी तीन हजार प्रमाणे सहा हजार रुपयांची मागणी केली. तर कनिष्ठ लिपिक नितीन राबाडेने एक हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागाने लाचेच्या मागणीची कार्यालयात जाऊन पडताळणी केली. आज कार्यालयात सापळा रचून सुर्वे हिला सहा हजाराची लाच घेताना विभागाने रंगेहाथ पकडले. तसेच राबाडेने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही विभागाने ताब्यात घेतले. 

कारवाई उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक एम. के. पाटील, सहायक फौजदार मनोहर खनगांवकर, कर्मचारी आबासाहेब गुंडणके, संदीप पावलेकर, कृष्णात पाटील, छाया पाटोळे, चालक सूरज अपराध यांनी केली. 

2013 मध्येही कारवाई 
2013 मध्ये पंचायत समितिच्या जुन्या इमारतीत तत्कालीन गटविकास अधिकारी व्ही. एम. सुर्वे यांच्यावरही "लाचलुचपत'ने त्यांच्या कार्यालयातच कारवाई केली होती. त्यानंतर आता नव्या इमारतीत गटशिक्षण अधिकारी प्रतिभा सुर्वे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्या. 

Web Title: block education officer taking bribe