कुंभारगांव येथे गणेशत्सवानिमित्त रक्तदान वृक्षारोपन

प्रा. प्रशांत चवरे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

भिगवण - कुंभारगांव (ता.इंदापुर) येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या विना वर्गणी उत्सव साजरा करत व विधायक उपक्रम राबवित वेगळा आदर्श निर्माण केली आहे. यावेळी आयोजित रक्तदान शिबीरामध्ये ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले तर तरुण मंडळाच्या वतीने २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

भिगवण - कुंभारगांव (ता.इंदापुर) येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या विना वर्गणी उत्सव साजरा करत व विधायक उपक्रम राबवित वेगळा आदर्श निर्माण केली आहे. यावेळी आयोजित रक्तदान शिबीरामध्ये ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले तर तरुण मंडळाच्या वतीने २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

गणेशोत्सव म्हटले की वर्गणी हे समीकरण रुढ होत असताना कुंभारगांव(ता.इंदापुर) येथील क्रांती गणेशोत्सव मंडळातील सुमारे १५० तरुणांनी एकत्र येत विना वर्गणी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या वतीने रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, राजेंद्र देवकाते, सरपंच जयश्री धुमाळ, सिताराम नगरे, प्रकाश भोई, मंडळाचे अध्यक्ष उमेश सल्ले उपाध्यक्ष अण्णा चव्हाण, सचिव सोमनाथ नगरे उपस्थित होते. यावेळी ८२ रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरामध्ये सहभाग घेतला.

गावांमध्ये २०० वृक्षांची लागवड करण्यात आली तर जांभुळ, आंबा, पिंपळ आदी वृक्ष ग्रामस्थांना भेट देत वृक्षाचे संगोपण करणाऱ्या व्यक्तींचा पुढील गणेशोत्सवांमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०२ रुग्नांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर १० लोकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले व १२ लोकांची मोतीबिंदु शस्त्रिक्रिया करण्यात येणार आहे. दलीतवस्ती येथील पाण्याचा प्रश्न विचारात घेऊन कुपनलिका व इलेक्ट्रीक मोटारीची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवामध्ये भारुड, किर्तन आदी प्रबोधनात्मक उपक्रमही राबविण्यात आले आहे.

उपक्रमाबाबत बोलताना भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणाले, कुंभारगांव येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विधायक गणेशोत्सवाचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. परिसरातील इतरही मंडळानी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे संयोजन दत्ता नगरे, सुरेश नगरे, अजित नगरे, कुंदन परदेशी यांनी केले.   

Web Title: Blood Donation and Plantation at Ganeshotsav at Kumbhar Nagar