पूरग्रस्तांसाठी नेर्ले येथे गुरुवारी रक्तदान शिबीर; सहभागी होण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नेर्ले (कोल्हापूर) : नेर्ले येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना ताबडतोब रक्त मिळावं यासाठी नेर्ले गावातील सर्व युवक मंडळे व पूरग्रस्त मदत ग्रुप यांच्या वतीने महारक्तदान शिबीर आयोजित होत आहे.

विठ्ठल रुख्मिणी देवस्थान हॉलमध्ये (ता. 15) रोजी सकाळी साडे नऊ वाजता हे शिबीर घेण्यात आले आहे. महापुरात अनेक रोगांना लोकांना सामोरे जावे लागत असताना धान्य, साहित्य पोहोच झाले परंतु रक्त कमी पडत आहे.  

भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई, पोलिस उपनिरिक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार रविंद्र सबनीस पूरग्रस्त ग्रुपचे निलेश साठे यांच्यासह युवक उपस्थित होणार आहेत यात सर्व परिसरतील युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood donation camp at Nerle Kolhapur for flood victims