बोगस डॉक्‍टरवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सोलापूर : शैक्षणिक पात्रता नसताना बेकायदेशीरपणे डॉक्‍टर अशी उपाधी लावून वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणात तुषार देवेंद्रनाथ रॉय (वय 38, रा. गंगाधरनगर, किसान संकुलच्या शेजारी, एमआयडीसी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रॉय हा मूळचा कोलकता येथील असून गेल्या 12 वर्षांपासून कुमठा नाका परिसरात दवाखाना चालवत होता. महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे तक्रार आली होती. महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना घेऊन रॉयच्या दवाखान्यावर छापा टाकला. तेथील साहित्य आणि कागदपत्रे जप्त केली. रॉय याने वैद्यकीय व्यवसायाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता नसतानाही व्यवसाय केला. वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार रॉय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी डॉ. बालराज म्हेत्रे (रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक वीसेंद्रसिंग बायस तपास करीत आहेत.

Web Title: A bogus doctor filed a complaint