बॉंबच्या अफवेने रेल्वे साडेतीन तास थांबवली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

कोपरगाव - पुण्याहून हटियाकडे जाणारी रेल्वे आज बॉंबच्या अफवेमुळे कोपरगाव रेल्वे स्थानकामध्ये साडेतीन तास थांबविण्यात आली. पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केल्यानंतर, काहीही आढळून न आल्याने सर्वांनी निःश्‍वास सोडला.

ही गाडी सकाळी 11 वाजता पुण्याहून निघाली होती. बारा बोगींच्या या गाडीत सुमारे एक हजार प्रवासी होते. अज्ञात व्यक्तीने गाडीत बॉंब असल्याचे पुण्यात रेल्वे प्रशासनास कळविले. त्यामुळे ही गाडी तातडीने कोपरगावला सायंकाळी सव्वाचार वाजता थांबविण्यात आली. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांसह अनेकांची धांदल उडाली. अनेक जणांनी रेल्वे सोडून फलाटावर व आजूबाजूस थांबणे पसंत केले. या प्रकारानंतर सोलापूर, दौंड, मनमाड येथील पोलिस, तसेच कोपरगाव तालुका पोलिसांनी तातडीने बोगींची व प्रवाशांकडील सामानाची तपासणी केली. साडेतीन तासांच्या तपासणीनंतर गाडीत बॉंब नसल्याचे स्पष्ट झाल्यावर ती मार्गस्थ करण्यात आली.

Web Title: Bomb rumor railway