
-रवींद्र माने
तासगाव : जगभरात अत्यंत दुर्मीळ असलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुपच्या हैदराबाद येथे असलेल्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्याने सांगली आणि कोल्हापुरातील रक्तदाते धावून गेले. कोल्हापूरहून विमानाने हैदराबादला रक्त पाठवल्यानंतर त्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतात बॉम्बे ब्लड ग्रुपच्या केवळ १७९ व्यक्ती आहेत. त्यापैकी एकासाठी रक्तदात्यांनी पदरमोड करून केलेली धडपड यशस्वी झाली.