जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या तरूणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नगर : कर्जतमधील मुख्य रस्त्यावर असलेल्या पीर दावल मलिक देवस्थानाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्द्यावरून काल (ता. 20) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या तौसिफ हासीम शेख या कार्यकर्त्याचे आज पहाटे पुण्यातील पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. दुपारी तीनच्या सुमारास त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला होते. त्यात तो 80 टक्के भाजला होता. 

कर्जतमधील पीर दावल मलिक देवस्थानाच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी तौसिफ शेखसह तेथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी जून महिन्यापासून वारंवार आंदोलने केली. मात्र, त्याची दखल घेतली न गेल्याने तौसिफ याने काल टोकाचे पाऊल उचलले. काल (ता.20) दुपारी सव्वातीनच्या सुमारास मोटारीतून तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला होता. मोटारीतून उतरल्याबरोबर त्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. अचानक आगीचा मोठा भडका उडाला. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकाराने आणि नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर तातडीने चादर, शाल टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि, तो पर्यंत खूप उशिर झाला. त्यामुळे तो त्यात गंभीर भाजला होता. 

कर्जत कडकडीत बंद..! 
कर्जतमधील पीर दावल मलिक देवस्थानाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी अनेदका आंदोलने झाली. मात्र, त्याची दखल न घेतल्यानेच तौसिफ शेखचा बळी गेल्याची भावना व्यक्त करत आज कर्जत शहर कडकडीत बंद करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये व बाजारपेठेत त्यामुळे शुकशुकाट आहे. या घटनेची तत्काळ दखल घेऊन आता अतिक्रमणे काढण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व अतिक्रमणे तत्काळ काढण्यात यावीत, या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 

Web Title: a boy died who try to commit suicide in front of Nagar district office