Video : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ब्राह्मण मुख्यमंत्री जन्मावा लागला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट मंत्री जानकर यांनी केला आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बबनराव शिंदे यांनाही राष्ट्रवादी सोडण्याचे आवाहन जानकरांनी केले.

पंढरपूर : 'आजपर्यंत सत्तेत मराठा समाजाचे वर्चस्व  होते. पण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी  एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला,' असा टोला पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी लगावला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अरण या संत सावता माळी यांच्या गावी माळी समाजाचा मेळावा सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आयोजित केला होता. यावेळी जानकर बोलत होते. माळी समाजाला एकसंघ राहण्याचा सल्ला देताना जानकर यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर वक्तव्य केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी गेली अनेक वर्ष केली जात होती, पण त्याकडे सत्तेतील मराठा नेतृत्वाने दुर्लक्ष केले. शेवटी एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याचा जन्म झाला, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले, असा टोला जानकर यांनी मराठा नेत्यांना लावला आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट मंत्री जानकर यांनी केला आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बबनराव शिंदे यांनाही राष्ट्रवादी सोडण्याचे आवाहन जानकरांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Brahmin chief minister was born to give reservation to the Marathas