आलीशान गाड्या चोरणाऱ्या सराईत टोळीस अटक

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 29 जून 2018

मोहोळ (सोलापूर) : रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना चोरून आणलेल्या चारचाकी गाड्या विक्री करण्यासाठी मोहोळ येथे आलेल्या तीन जणांना सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी पुणे सोलापूर हायवे लगत असलेल्या नामांकित हॉटेल समोरून काल (ता. 28) पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पकडले. 

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. 28) पेट्रोलिंगच्या वेळी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरालगत चैतन्य प्रसाद हॉटेल समोर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सोलापूर ग्रामीण पथकाच्या टिमला माहितीदाराकडून खबर मिळाली की, पोपट उर्फ प्रदीप सिद्धार्थ कुंभार, (रा. मोरवंची ता. मोहोळ) अमोल बाळकृष्ण कौलगे (रा.पंढरपूर विक्रम नंदकुमार ढाळे, रा.पिराची कोरवली) हे तिघे चोरलेल्या गाड्या विक्रीचा व्यवहार करण्यासाठी मोहोळ येथे येणार आहेत. वरील तिघे इनोव्हा कार क्र एम .एच. १८, ए.सी.००४२, फॉरचुनर कार क्र एम. एच.१२ आर. आर. ७५७७ व दुसरी एक विना नंबर असलेली इनोव्हा कार अशा तीन गाड्या संशयितरित्या त्यांच्याकडे मिळून आल्या.  

सदर गाड्या चोरीच्या असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आज (ता . २८) मोहोळ येथील न्यायालयासमोर वरील तिघा संशयितांना उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पोलिस  विशाल गायकवाड करत आहेत.

Web Title: branded car robbers arrested at mohol