पुण्यात नोव्हेंबरमध्ये होणार सोलापुरचे ब्रँडिंग : सहकारमंत्री

Branding in Solapur will be held in Pune in November says Deshmukh
Branding in Solapur will be held in Pune in November says Deshmukh

सोलापूर : सोलापूरातील विविध उत्पादनांचे ब्रॅण्डींग व्हावे. त्या उत्पादनाला हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यातून सोलापूरात छोटे-छोटे उद्योग सुरु व्हावेत, या उद्देशाने पुण्यातील साखर संकुलच्या मैदानावर 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर महोत्सव आयोजित केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

या महोत्सवात शंभरहून अधिक स्टॉल सोलापुरातील उत्पादनांची असणार आहेत. या महोत्सवासाठी सोशल मिडीयासह अन्य माध्यमातून मार्केटिंग करण्यात येत आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. 

गावापासून आता रोजगार निर्मिती 

सोलापूर सोडण्याऱ्यांना इथेच थांबविण्याकरिता स्थानिक गरज ओळखून स्वंयरोजगार निर्मितीसाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. सोलापूरातून बाहेर गेलेल्यांना बोलावून मोठा मेळावा घेण्याचे नियोजन आहे. तसेच सोलापुरातील विविध उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून बेंगलोर मध्ये प्रदर्शन भरविण्याचे नियोजनही केले जात असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

याचे होणार मार्केटिंग 

सोलापुरातील ज्वारी, डाळींब, सीताफळ, बेदाणा, अनार दाणा, शेंगा चटणी, कडक भाकरी, लांबोटी चिवडा, शेंगापोळी या खाद्यपदार्थांसह सोलापुरातील चादर, बेडशीट, टॉवेल, बार्शीची हातमागावरील पैठणी, केमचे कुंकू, पंढरपूरची अगरबत्ती, घोंगडी, औद्योगिक उत्पादने, कृषी अवजारे, गारमेंट या उत्पादनांची तसेच पंढरपूर, अक्‍कलकोट, सिध्दरामेश्‍वर, अरणचे संत सावता माळी आणि मंगळवेढ्याचे संत दामाजी या तिर्थक्षेत्रांची व पर्यटन स्थळांचीही माहिती, विविध , उजनी धरणाची माहिती, बचत गटांची उत्पादने, चार हुतात्म्यांची माहिती, विठ्ठलाच्या दगडी मुर्ती, रेखाटलेली चित्रे, मृदूंग, विना, तबला वादन कला याचीही माहिती या महोत्सवात दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com