esakal | महिलेला केले हातवारे अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Breach Of Modesty Crime On Bakery Owner Kolhapur Marathi News

शहरातील लक्ष्मी रोडवर शॉपिंग कॉम्प्लेक्‍समध्ये हिम्मतची राजलक्ष्मी नावाने बेकरी आहे. तो राजस्थानचा असून सध्या गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे राहतो. बुधवारी (ता. 25) दुपारी दोनच्या सुमारास लक्ष्मी रोड परिसरातील एका विवाहितेला हातवारे करून त्रास देऊ लागला.

महिलेला केले हातवारे अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - शहरातील एका विवाहितेची छेड काढल्याबद्दल राजलक्ष्मी बेकरीच्या मालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. हिम्मत (पूर्ण नाव नाही) असे या बेकरी मालकाचे नाव असून तो राजस्थानचा आहे. महिलेच्या तक्रारीवरून आज सायंकाळी त्याच्याविरुद्ध पोलिसात विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. 

शहरातील लक्ष्मी रोडवर शॉपिंग कॉम्प्लेक्‍समध्ये हिम्मतची राजलक्ष्मी नावाने बेकरी आहे. तो राजस्थानचा असून सध्या गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे राहतो. बुधवारी (ता. 25) दुपारी दोनच्या सुमारास लक्ष्मी रोड परिसरातील एका विवाहितेला हातवारे करून त्रास देऊ लागला. तसेच सायंकाळच्या सुमारास त्या महिलेच्या मोबाईलवर आपल्या मोबाईलवरून लज्जा उत्पन्न होईल, असे मॅसेजही पाठविले. त्याच्या या त्रासाला कंटाळून तिने पतीला याची माहिती दिली. 

हेही वाचा - द्राक्ष पट्ट्यातील बागांना लागले ग्रहण 

पतीला म्हणाला, तू कोण विचारणार

दरम्यान, आज सकाळी दहाच्या सुमारास संबंधित महिलेचा पती बेकरीत येऊन हिम्मतला याचा जाब विचारला. त्यावेळी हिम्मतने उलट महिलेच्या पतीलाच शिवीगाळ करून तू कोण विचारणार, अशी दमदाटी केली. त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाची ऐकून नागरिकांनी गर्दी केली. नेमका प्रकार समजल्यानंतर नागरिकांनीच हिम्मतला बाहेर ओढून चांगलाच चोप दिला. मारहाण सुरू असतानाच त्या गर्दीतून तो पसार झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याच्या बेकरीतील विविध साहित्य रस्त्यावर भिरकावून दिले. यावेळी लक्ष्मी रोड परिसरात एकच गर्दी उसळली होती. सायंकाळी संबंधित महिलेने हिम्मतविरूद्ध पोलिसात फिर्याद दिली असून त्याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.  

हेही वाचा - महाराष्ट्र एकिकरण समितीबाबत भीमाशंकर पाटील यांचे हे वादग्रस्त विधान