दहावी-बारावीच्या परीक्षेतील बोगसगिरीला "ब्रेक' 

संतोष सिरसट
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सोलापूर : शिक्षण विभागात आता डिजिटलचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी डिजिटल माहिती भरून बोगसगिरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेतील बोगस विद्यार्थी दाखविण्याच्या पद्धतीला यापुढे "ब्रेक' लागणार आहे. 

सोलापूर : शिक्षण विभागात आता डिजिटलचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी डिजिटल माहिती भरून बोगसगिरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेतील बोगस विद्यार्थी दाखविण्याच्या पद्धतीला यापुढे "ब्रेक' लागणार आहे. 

फेब्रुवारी- मार्च 20019 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आता "सरल' (विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची माहिती एकत्रित मिळणारी संगणकीय प्रणाली) या प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीचा उपयोग केला जाणार आहे. विद्यार्थ्यांची माहिती "सरल'मध्ये अपडेट करून घेण्यास 31 ऑगस्टची मुदत दिली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी यापूर्वी लेखी आवेदनपत्रे भरली जात होती. मात्र, ती आवेदनपत्रे भरताना विद्यार्थ्यांची माहिती "सरल'मध्ये न भरता थेट त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच भरले जात होते. त्यामुळे शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांचेही परीक्षा अर्ज भरले जात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात "आर्थिक' उलाढाल होत होती. केवळ परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्या आर्थिक देवाण-घेवाणीला आता ब्रेक लागणार आहे. 

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सर्व माहिती "सरल' या संगणकीय प्रणालीमध्ये भरली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या माहितीचा समावेश असतो. दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज भरताना परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती "सरल' डाटा वरुन ऍटो पॉप्युलेट पद्धतीने नमूद करून घेण्याच्या सूचना परीक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सगळी माहिती सरल प्रणालीमध्ये अपडेट करून घेण्यास सांगितले आहे. ज्या विद्यार्थ्यांची माहिती सरल मध्ये अपडेट केली जाणार नाही, त्या विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे एखादा विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची असेल. 

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी दहावी-बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची सगळी माहिती "सरल' प्रणालीमध्ये भरायची आहे. त्या माहितीच्या आधारेच परीक्षेचे फॉर्म भरले जाणार आहेत. 
- रमेश जोशी, प्रभारी शिक्षणाधिकारी, माध्यमिक. 

Web Title: The "break"on the SSC exam bogusness