नवरा-नवरीने केले पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामात श्रमदान

pani-foundation.jpg
pani-foundation.jpg

माढा (सोलापूर) : माढा तालुक्यातील जामगाव येथे पाणी फाऊंडेशनच्या कामावर शनिवारी ( ता. 27 ) नवरा - नवरी, वऱ्हाडी मंडळीं, ग्रामस्थ, पै- पाहुणे यांनी श्रमदान करत विवाह संपन्न करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. बँड, ढोल, ताशाच्या बरोबरच पाणी फाउंडेशनच्या या कामावरती पाट्या, कुदळ, खोरे, फावडे यांची आवाज घुमला आणि श्रमदानाने हा विवाह संपन्न करण्यात आला.

जामगाव (ता. माढा) येथील कुमार उत्तम चव्हाण यांचा विवाह ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा) येथील अमृता भाऊराव देशमुख हिच्याशी ठरला. कुमार यांनी लोथवडे (ता. माण) येथे पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले. बारावीपर्यंत शिक्षण झालेले कुमार शेती करतात. या लग्नात त्यांनी हुंडा, रूखवत साहित्य न घेता पाणी फाउंडेशनच्या कामावर श्रमदान करून विवाह संपन्न केला. जलसंधारणाच्या कामाबाबत प्रबोधन व्हावे या हेतूने पाणी फाऊंडेशनच्या ठिकाणीच वऱ्हाडी मंडळींसह श्रमदान करून शनिवारी (ता. 27) विवाह संपन्न केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामगावचे ग्रामस्थ, विवाहासाठी आलेली वधू- वर पक्षाकडील वऱ्हाडी मंडळी तसेच माढयातील रोटरी कल्बचे पदाधिकारी व सदस्यांनी श्रमदान केले. 

सरपंच सुहास पाटील - जामगावकर यांनी या उपक्रमास वधु-वर पक्षाकडील लोकांना प्रोत्साहित केले. पाणी फाऊंडेशनचे समन्वयक राजकुमार माने, सुशांत गायकवाड, रोटरीचे अध्यक्ष भारत लटके, सचिव चारूदत्त माढेकर, रोटरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पाटील, डॉ. संदीप टोंगळे, सामाजिक प्रशिक्षक ज्योती सुर्वे, तांत्रिक प्रशिक्षक अंकिता पवार, सुप्रिया जंगले, प्रतिमा सुर्यवंशी, चेतन जाधव, वसीम शेख, समाधान चव्हाण, अमोल चव्हाण, व्यंकटेश कुलकर्णी, महादेव चव्हाण, शंकर चव्हाण, रेखा चव्हाण, वैशाली चव्हाण, अर्चना घोडके, अनुराधा शिरतोडे, प्रमोद पाटील, प्रफुल्ल घो़डके, प्रार्थना पाटील यांनी या उपक्रमास सहकार्य व मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com