

Atpadi Fraud Case Middleman Promises Marriage Bride Escapes with Money
Esakal
नागेश गायकवाड, सकाळ वृत्तसेवा : आटपाडीतील देशमुखवाडी इथं एका ४० वर्षीय तरुणाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एका आरोपीला अटक करण्यात आलीय. पीडित तरुणाचं लग्न होत नसल्यानं मध्यस्थ सचिन बाबर याने नवरी शोधून देऊ असं सांगितलं. मात्र कोणताही गाजावाजा न करता लग्न करण्याची अट घातली. त्यानुसार एका मंदिरात जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न लागलं. मात्र त्याच रात्री नवरीने नवरदेवाला गुंगीचं औषध पाजून पोबारा केला. तिने जाताना सोबत दागिने आणि लाखोंची रोकड पळवली.