नवरी नटली अन् प्रियकरासोबत पळाली...

bride ran away with her boyfriend at nagar distrisct
bride ran away with her boyfriend at nagar distrisct

नगरः विवाहानंतर काही वेळातच नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना येथे घडली असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जिल्ह्यामध्ये नवरी नटून पळाल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ही घटना आहे. विवाहानंतर नव दांपत्य दुचाकीवरून मढी कानिफनाथला देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर नवरदेव पार्किंमधील दुचाकी आणण्यासाठी गेला. यावेळी नवरीने प्रियकराच्या दुचाकीवरून धूम ठोकली. हा सर्व प्रकार देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पार्किंगमधून दुचाकी घेऊन आलेला नवरदेव पत्नीला शोधू लागला. शोधाशोध करूनही पत्नी सापडली नाही. अखेर मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. यावेळी सीसीटीव्हीमध्ये पती पार्किंगमध्ये दुचाकी घेण्यासाठी गेल्यानंतर दुसरीकडे प्रियकर गाडी घेऊन तयार असल्याचे दिसत आहे. पती पार्किंगमध्ये गेल्यानंतर नवरी प्रियकरासोबत पळून जाताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com