अग्रणी नदीवरील पूल खचला; आतापर्यंत तिघांचा बळी, उंची वाढवण्याची मागणी

Bridge over the leading river eroded; Victims of three so far, demand to increase height
Bridge over the leading river eroded; Victims of three so far, demand to increase height

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील गावांना जोडणारा मोरगाव येथील अग्रणी नदीवरील पूल खचू लागला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आल्याने दोन दिवस पश्‍चिम विभागातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. पुलाला दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. नदीवरील पूलाला पाच वेळा पूर आल्याने आतापर्यंत तिघांचा बळी गेला. मुळात पुलाची उंची कमी असल्याने पुलाची उंची वाढवण्याची गरज आहे.आतातरी पुल खचल्याने आता तरी नवीन पूल उभा राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील मोरगाव, हिंगणगाव येथे अग्रणी नदीवर पूल आहेत. यावर्षी अग्रणी नदीला चारवेळा पूर आला. पूर आल्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद होऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत होते. मोरगाव, देशिंग, खरशिंग मार्गे मिरजला जाणारा हा जवळचा मार्ग असून गत दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला महापूर आला. महापुरात पूल पाण्याखाली गेला. दोन दिवस पूल पाण्याखाली असल्याने काही गावांचा संपर्क बंद होता. वाहतूक व्यवस्था बंद होती. दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून त्या परिसरातील लोक शिरढोण मार्गे कवठेमहांकाळला ये-जा करतात. 

तालुक्‍याची वरदायिनी असलेली अग्रणी नदी यंदा दुथडी भरून वाहत आहे.यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आला व नदीचे पाणी पात्राबाहेर राहून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान पूलाची उंची वाढवावी यासाठी वारंवार निवेदने,मागण्या केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आतापर्यंत नदीला पूर आल्याने तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.आता तरी पूलाची उंची वाढणार का असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. 

पुलाबाबत मंत्र्यांचे आश्‍वासन 
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुमन पाटील हे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकाच्या पाहणी दौऱ्यात आले असता मोरगाव येथील अग्रणी नदीच्या पुलाची उंची वाढवावी. नदी पात्रातील गाळ काढावा. कवठेमहांकाळ ते खरशिंग फाटा रस्त्याचे रुंदीकरण करावे यासंदर्भात चर्चा केली झाली. कृषिराज्यमंत्री डॉ.कदम यांनी सकारात्मक आश्वासन दिले असून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे युवा नेते चैतन्य पाटील यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com