नगर - भांबोऱ्यात शेतीच्या वादातून भावाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

राशीन (नगर) : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून मेव्हण्याच्या सांगण्यावरून कट रचून एकाने आपल्या दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाच्या डोक्‍यात टिकाव घातला. यात हनुमंत कोंडिबा चव्हाण (वय 55, रा. भांबोरे, यमाईनगर, ता. कर्जत) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या हनुमंत चव्हाण यांचा मुलगा राहुल चव्हाण याच्या फिर्यादीवरून रमेश कोंडिबा चव्हाण, किरण चव्हाण, गणेश चव्हाण (रा. भांबोरे, यमाईनगर, ता. कर्जत) व सुनील रामदास पवार (रा. घुगलवडगाव, ता. श्रीगोंदे) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मृत हनुमंत व त्यांचा भाऊ रमेश यांच्यात रविवारी (ता. 6) सायंकाळी पाचच्या सुमारास जमिनीच्या हिश्‍शावरून वाद झाला. त्या वेळी रमेशने हनुमंत यांचे ऐकून न घेता शिवीगाळ करीत खोरे, लाकडी दांडके व लोखंडी टिकाव घेऊन तिघे हनुमंत यांच्या अंगावर धावून आले. या वेळी हनुमंत यांची मुले राहुल व महेंद्र भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यांनाही मारहाण करण्यात आली. गणेशने हातातील टिकाव डोक्‍यात मारल्याने हनुमंत गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले. त्यानंतर तिघे घटनास्थळावरून निघून गेले. 
हनुमंत यांना उपचारासाठी तत्काळ दौंड (जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात व तेथून पुढील उपचारासाठी पुणे येथे नेले जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कर्जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. हनुमंत यांच्यावर रात्री पावणेबाराच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई, असा परिवार आहे. संशयित आरोपी पसार असल्याने कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

Web Title: brother s murder for farmin bhambora nagar