

11-Year-Old Boy Saves Sister from Leopard Attack
esakal
Leopard Attack News : उपवळे (ता. शिराळा) येथे हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. प्रसंगावधान राखत ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून तिला सोडविल्याने बालिकेचा जीव वाचला. स्वरांजली संग्राम पाटील (वय ९) असे जखमी बालिकेचे नाव आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकरा वर्षांच्या शिवमच्या धाडसाचे कौतुक होत आहे. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली.