‘बीएसएनएल’ सेवा आज ठप्प होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

सातारा - केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने देशातील सुमारे ६५ हजार मोबाईल टॉवर्स हे सहायक कंपनीस वर्ग करण्याची भूमिका घेतल्याच्या निषेर्धात उद्या (गुरुवार) भारत संचार निगम लिमेटडच्या सर्व युनियननी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात सातारा जिल्ह्यातील सुमारे ३५० ते ४०० कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

मोबाईल टॉवर्सची यंत्रणा अन्य कंपनीला दिल्यास ‘बीएसएनएल’ला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसेल. हा वर्गीकरणाचा डाव म्हणजे ‘बीएसएनएल’ची एक प्रकारे खासगीकरणाकडे वाटचाल असल्याचे द्योतक असल्याचे कर्मचाऱ्यांना वाटते. या निर्णयाच्या विरोधात ‘बीएसएनएल’मध्ये कार्यरत असलेल्या सर्वच युनियन्स एकवटल्या आहेत. 

दरम्यान, उद्या (गुरुवारी) होणाऱ्या संपामुळे ‘बीएसएनएल’वर आधारित असलेल्या सेवांमध्ये इंटरनेट, मोबाईल, लॅंडलाईन आदींमध्ये बिघाड झाल्यास दिवसभर त्या सेवा ठप्प होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: BSNL service is block today