बुद्धविचार विज्ञानयुगातही उपयुक्त - डॉ. आ. ह. साळुंखे

संजय शिंदे
सोमवार, 30 एप्रिल 2018

सातारा - प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या कसोटीवर तपासल्यानंतरच स्वीकारायची, या बुद्धांच्या उपदेशात विज्ञानाच्या सर्व तत्त्वांचे सार आल्यामुळे बुद्ध विज्ञानयुगातही कालबाह्य होत नाहीत, असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

डॉ. साळुंखे यांचा "सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध' हा ग्रंथ लोकप्रिय झाला आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त साळुंखे यांच्याशी केलेली चर्चा. 

प्रश्‍न - विज्ञानयुगात धर्म ही संकल्पनाच कालबाह्य झाली आहे, असे अनेकजण मानतात. मग, अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बुद्धांच्या विचाराला वर्तमानकाळात खरोखरच काही संदर्भमूल्य आहे का ? 

डॉ. साळुंखे - धर्म कालबाह्य झाल्याच्या अभिप्रायाविषयी मी येथे काही बोलत नाही. परंतु, बुद्धांच्या विचारांविषयी मात्र जरूर बोलतो. विज्ञान सत्याचा शोध घेते आणि बुद्ध आजही त्या मार्गावर सर्वांच्या पुढेच आहेत. विज्ञान वा तत्त्वज्ञान या क्षेत्रातच ते मार्गदर्शक नाहीत, तर दैनंदिन व्यवहारातही ते सर्वांनाच उच्च आनंदाची वाट दाखवतात. ऐकीव माहिती, परंपरा, एखाद्या पवित्र ग्रंथाचा उपदेश, पदार्थांचे बाह्य सौंदर्य, एखाद्या गुरूचे मार्गदर्शन यापैकी काहीही आंधळेपणाने स्वीकारू नये, तर प्रत्येक गोष्ट आपल्या अनुभवाच्या कसोटीवर तपासल्यानंतरच ती स्वीकारायची की स्वीकारायची नाही हे ठरवावे, या त्यांच्या उपदेशात विज्ञानाच्या सर्व तत्त्वांचे सार आले असल्यामुळे बुद्ध विज्ञानयुगातही कालबाह्य होत नाहीत. 

प्रश्‍न - सध्या समाजात वेगवेगळ्या घटकांत या ना त्या कारणाने दरी निर्माण होताना दिसत आहे. त्यावर बुद्धांचे विचार उपाय ठरू शकतील का ? 

डॉ. साळुंखे - बुद्धांनी आपले अवघे आयुष्य वेगवेगळ्या लोकांना जोडण्यासाठीच खर्ची घातले. लोक एकमेकांपासून तुटतील असे त्यांनी काही केले वा सांगितले नाही. "द्वेष सोडा' म्हणजे मी तुमचा जामिनदार होतो, असे म्हणण्याइतकी सहिष्णुता त्यांच्या विचारात होती. जातीच्या कारणाने कोणीही श्रेष्ठत्वाची किंवा न्यूनत्वाची भावना न बाळगता माणूस म्हणून सर्वांनी एकमेकांशी समतेने वागावे. आपले स्वातंत्र्य जपत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर कधीही अतिक्रमण करू नये, ही त्यांच्या चरित्राची वैशिष्ट्ये आपल्या समाजातील विविध घटकांमध्ये निर्माण होणारी दरी नक्कीच दूर करतील. 

Web Title: Buddha thought Useful in science era