बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया शाखा फलटण पदग्रहण समारंभ

संदिप कदम 
रविवार, 29 एप्रिल 2018

नामांकीत बिल्डर कै. अशोकभाऊ शिंदे यांचे स्मरणार्थ बांधकाम भुषण स्मृती पुरस्काराने महिला उद्योजकांचे प्ररेणास्थान व उत्कृष्ठ बांधकाम व्यवसायाईका कै. सौ. सुवर्णा प्रमोद जगताप (मरणोत्तर) सन्मानित करण्यात येणार आहे.

फलटण शहर (जि. सातारा) - बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया शाखा फलटण पदग्रहण समारंभ (ता. 30) रोजी सायंकाळी 7 वाजता सजाई गार्डन येथे होणार असल्याची माहिती चेअरमन प्रमोद निंबाळकर यांनी दिली.

बांधकाम, रोड, फर्निचअर व्यवसाईक, पुरवठादार यांच्या हक्कासाठी 2006 साली प्रथम 13 सभासदांपासून झालेल्या असोसिएशन मध्ये आज 72 छोटे मोठे व्यवसाईक सहभागी झाले आहेत. असोसिएशनच्या माध्यमातून शासना नियमानुसार कायद्यात करण्यात येत असलेल्या बदलांबाबतच्या जागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन, ग्राहकांना अद्यावत तंत्रज्ञान व तसेच बॅंकींगशी निगडीत माहिती उपल्बध करुन देण्यात येत असते.

यावेळी बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया शाखा फलटणच्या कार्यकारणी निवडीमध्ये चेअरमन पदी राहुल नलवडे, व्हाईस चेअरमन पदी सुनिल जंगम, सचिवपदी केदार करवा व खजिनदार पदी मंगेश शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्या असून त्यांचा सत्कार  व बांधकाम क्षेत्रातील नामांकीत बिल्डर कै. अशोकभाऊ शिंदे यांचे स्मरणार्थ बांधकाम भुषण स्मृती पुरस्काराने महिला उद्योजकांचे प्ररेणास्थान व उत्कृष्ठ बांधकाम व्यवसायाईका कै. सौ. सुवर्णा प्रमोद जगताप (मरणोत्तर) पुरस्कराचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व असोसिएशन अध्यक्ष अविनाश पाटील यांचे हस्ते देण्यात येणार आहे. तरी या समारोहास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Builders Association Of India Branch Faltan Gathering ceremony