बंटी जहागीरदारला पुन्हा "एटीएस'ने ताब्यात घेतले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

श्रीरामपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता बंटी जहागीरदार याला आज मुंबई येथील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. तशी नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. बंटीची आई रजियाबी जहागीरदार या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका आहेत.

जहागीरदारला यापूर्वीही दोनदा दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. मुंबई येथील निरीक्षक शशिकांत जगदाळे यांचे पथक आज सकाळपासून जहागीरदारच्या मागावर होते. सायंकाळी सहाच्या सुमारास तो नगरपालिकेत आल्यानंतर दिलीप पवार यांच्यासह आलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्या वेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक तेथे उपस्थित होत्या.

जहागीरदारला ताब्यात घेऊन पथक मुंबईकडे रवाना झाले. शहर पोलिसांनी तशी नोंद केली. घटनेची माहिती मिळताच त्याच्या घरासमोर मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी रात्री तेथे बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: bunty jahagirdar arrested by ats