
कुपवाड : मिरज एमआयडीसीतील मास इंजिनिअरिंग कारखान्यातून १ लाख ६२ हजार ३६५ रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यांविरुद्ध कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. महेश विलास जाधव (वय २९, कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत फिर्याद सचिन आनंदा घाळे (वय ४०, चाणक्य चौक, कुपवाड) यांनी दिली.