नेर्ले येथे तिहेरी अपघातामध्ये बसमधील ६ प्रवासी गंभीर जखमी

विजय लोहार
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नेर्ले, ता. वाळवा -  येथील महामार्गावर तिहेरी अपघातात बस मधील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक रिक्षाचालकांनी जखमींना नेर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. 

नेर्ले, ता. वाळवा -  येथील महामार्गावर तिहेरी अपघातात बस मधील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक रिक्षाचालकांनी जखमींना नेर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. 

नेर्ले महामार्गावरील चौकात सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात घडला. महामार्गावरून बस क्र एम एच 14 बी टी 2936 कोल्हापूरकडे जात होती. नेर्ले येथील महामार्गावरील चौकात  कंटेनरच्या समोर अचानक एक मोटार आली. या मोटारीची धडक वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने ब्रेक दाबला. पण पाठीमागे असणाऱ्या बसला याचा अंदाज न आल्याने कंटेनरला बसने मागून धडक दिली. यावेळी बसचालक बंडू किसन फुले (वय 41 रा विडनी ता फलटण ) यांनीही ब्रेक मारला. यामुळे  समोरील सीट व पाईपवर प्रवासी आदळले. यात १६ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील युवक रिक्षा चालक यांनी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र नेर्ले येथे उपचारासाठी दाखल केले. 

या अपघातामध्ये बसमधील स्वरा प्रसाद औंधकर (वय 32 रा, कासेगाव), विष्णू नारायण बंकापुरे (वय 65 रा पारगाव,) देविदास बारकुजी शहरे (वय 66 रा कोल्हापूर विशाल आनंदा खंबाळे (वय 21 रा गारगोटी), पवन अर्जून कदम (वय 24 पुसेसावळी), अमोल शामराव ढाले (वय 40 रा कराड), वसंत हिंदुराव पाटील (वय 50  रा कासेगाव )हे गंभीर जखमी झाले त्यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हनुवटीला, तोंडाला, नाकाला गंभीर दुखापत झाली आहे .

हर्षदा हनुमंत जाधव (वय 19 सातारा,) अभिषेक आनंदा मालू गडे (वय 33 रा कोल्हापूर,) सोनाबाई बबन कोळेकर (वय 65 रा मोरगिरी) राजश्री हरीश लाड (वय 30 रा भुजाळे), मयुरी रामसिह राजपूत (वय30 रा कोल्हापूर), शितल दीपक कुलकर्णी (वय37 रा वडगाव,)आनंदा सर्जेराव कुंभार (वय 36 रा सातारा,)राजेश सावू (वय 22 सासवड),प्रताप पवार (वय 35 कराड,) अभिषेक माळवदे (वय 33 रा कोल्हापूर), योगेश जंगम (वय 38  रा सातारा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना वाहक संदीप अशोक काळेकर (रा कळे ता पन्हाळा) व रिक्षाचालक सुनील चव्हाण, जितेंद्र माने, सुनील कारंडे, वैभव जाखले यांनी मदत केली. डॉ सागर शिंदे, डॉ प्रनोती गायकवाड, डॉ शिवलिंग बगले, डॉ अमोल पाटोळे व आरोग्य कर्मचारी यांनी जखमींवर तातडीने उपचार केले 

Web Title: bus accident near Nerle highway