
दुसऱ्या टप्प्यात उत्पन्न वाढण्याची शक्यता होती. मात्र यंदा त्याचे सर्वच नियोजन कोलमडले आहे.
निपाणी (बेळगाव) : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा दोनवेळा सौंदत्ती येथील रेणुका मंदिर प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉकनंतर मंदिर सुरु झाले होते. त्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाने सवलतीच्या दरातील भाविकांना बससेवा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. काही भाविकांनी बसेसचे आरक्षणही केले होते. मात्र पुन्हा दुसऱ्यांदा सौंदत्ती येथील रेणुका देवीचे मंदिर प्रशासनाने बंद ठेवल्यामुळे सौंदत्ती यात्रेअभावी निपाणी आगाराला यंदा तब्बल 2 कोटीचा फटका बसला आहे. दुसऱ्या टप्प्यात उत्पन्न वाढण्याची शक्यता होती. मात्र यंदा त्याचे सर्वच नियोजन कोलमडले आहे.
निपाणी बसस्थानक हे कोकणच्या प्रवेशव्दारील मुख्य बसस्थानक आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभगासह महाराष्ट्रातील विविध खेड्यांचा या बसस्थानकाशी नित्याचा संबंध येतो. त्यामुळे विविध यात्रांसह शैक्षणिक सहलीतून उत्पन्न वाढीसाठी हे आगार महत्वाचे मानले जाते. यंदा यात्रा व सहलीही बंद झाल्यामुळे निपाणी आगाराला म्हणावे तसे उत्पन्न मिळालेले नाही. उलट लॉकडाऊनमध्ये बसफेऱ्या विस्कळीत झाल्यामुळे उत्पन्नात चांगलीच घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात दीट कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 1 ते 10 लाख उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र हे नियोजन कोलमडले.
हेही वाचा - आंबा प्रेमींसाठी खुशखबर; राज्य चाखणार आता हापूसची चव -
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे परिवहन महामंडळाचा आणखी जर लॉकडाऊन झाला तर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्याप कर्नाटक, महाराष्ट्रात बससेवा सुरु आहेत. मात्र कोरोनाची धास्ती मात्र कायम राहिली आहे.
"यंदा अनलॉकनंतर दुसऱ्या टप्प्यात सौंदत्ती यात्रेसह शैक्षणिक सहलीसाठी नियोजन सुरु होते. बसेसना मागणीही होती. मात्र पुन्हा कोरोनाच्या संसर्गामुळे प्रशासाने सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीसह इतर मंदिरे बंद ठेवल्याने यात्रेसह उत्पन्न वाढीचे नियोजन कोलमडले."
- व्ही. एम. शशीधर,विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी