
Sangli Tasgaon Accident : तासगाव तालुक्यातील बांबवडे-येळावी रस्त्यावर एसटी बस रस्त्यावरून घसरून बाजूच्या शेतात घुसली. दैव बलवत्तर म्हणून बस एका तुडुंब भरलेल्या विहिरीच्या कठड्याला धडकली आणि ती विहिरीत पडता पडता वाचली. अपघातात वाहक व १७ प्रवासी जखमी झाले. बस वेळीच थांबल्याने समोरच्या विहिरीत कोसळण्यापासून वाचली आणि अनर्थ टाळला. ही घटना काल दुपारी दीड वाजता घडली. तासगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.