
“Keep gold safe in bank lockers; theft incidents highlight need for secure storage.”
Sakal
सांगली: त्या रात्री अचानक बनावट अधिकारी आले, छापा टाकायचं नाटक केलं आणि एक किलो सोनं घेऊन निघून गेले... एवढं सोनं घरात का बरं ठेवलं, अशी चर्चा सगळीकडे झाली. ज्यांनी चर्चा केली, त्यांनी तरी सोनं कुठं ठेवलंय? त्यांनी बँकेच्या लॉकरचा पर्याय निवडला आहे का, हा प्रश्न आहेत. सोने खरेदी करा किंवा नको, हा वैयक्तिक विषय झाला, मात्र ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणे ही आजची गरज आहे.