अन्यायी उपयोगकर्ता कर रद्द करा... अन्यथा न्यायालयात जाऊ : मदनभाऊ युवा मंच

बलराज पवार
Tuesday, 6 October 2020

सांगली-  महासभेने विरोध करुन प्रशासनाने उपयोगकर्ता कर लावण्याचे गौडबंगाल काय? घनकचरा व्यवस्थापन सेवा दिल्यापोटी अनुसूचि एकमध्ये नमूद दराने उपयोगकर्ता शुल्क वसूल करता येते. मात्र महापालिका कचरा व्यवस्थापनाची सेवा पुर्ण क्षमतेने करत नसूनही हा कर वसूल करत आहे, ही अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे हा कर तातडीने रद्द करावा अन्यथा न्यायालयीन लढा उभारावा लागेल असा इशारा मदनभाऊ युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे. 

मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महासभेने या कराला विरोध केला आहे. आपली महापालिका ड वर्गातील असून घरपट्‌टीमधून स्वच्छता कर आकारणी करत आहे. त्यामुळे उपयोगकर्ता कराला नागरिकांचा विरोध आहे. 

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा गोळा करणे आणि त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा कर लावणे आवश्‍यक होते. पण अशी कुठलीही यंत्रणा महापालिकेने राबवलेली नसताना हा अन्यायकारक कर जनतेच्या माथ्यावर का मारला आहे? कचरा वर्गीकरण केंद्र, कचरा खत केंद्र उभारणे, कचरा प्रक्रिया केंद्र असे विविध उपाय योजना केल्यावर उपयोगकर्ता कर वसूल करु शकतात. मात्र यातील कुठलीही सेवा महापालिका करत नसतानाही कर वसूल केला जात आहे, हे अन्यायकारक आहे. तरी हा कर रद्द करावा असे पत्रकात म्हटले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancel unfair user tax. otherwise go to court : Madanbhau Yuva Manch