केदारवाडी व येवलेवाडीच्या दरम्यान मोटारीची ट्रॅक्‍टरला धडक...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

केदारवाडी व येवलेवाडीच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोटारीने पाठीमागून ट्रॅक्‍टरला दिलेल्या भीषण धडकेत चालक महिलेसह दोघे गंभीर जखमी झाला. 

नेर्ले (सांगली) - केदारवाडी व येवलेवाडीच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोटारीने पाठीमागून ट्रॅक्‍टरला दिलेल्या भीषण धडकेत चालक महिलेसह दोघे गंभीर जखमी झाला. 

घटनास्थळावरून कळालेली माहिती अशी की, केदारवाडी व येवलेवाडीच्या दरम्यान देसाई मळ्याजवळ शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास मोटारीने (एमएच 04, जीएम 888) कारचालिका रेश्‍मा अशोक ईदानफाय या कोल्हापूर कडे जात होत्या. यावेळी दुसऱ्या वाहनाला ओव्हर टेक करत असताना पुढे असलेल्या महामार्गावरून कोल्हापूरकडे उसाची मळी भरून निघालेल्या ट्रॅक्‍टरला (एमएच 39, एनडी 64) पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, गाडीतील एअरबॅग फुटल्या. यामुळे कारचालिका सौ. रेश्‍मा (47 वर्षे) व पुढील सीटवर बसलेले खुषाल शेट्टी (वय 64) हे गंभीर जखमी झाले.

वाचा सविस्तर - पोल्ट्री व्यवसाय गोत्यात का आला ? वाचा सविस्तर...  

अपघात घडताच परिसरातील ग्रामस्थांनी व कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढून हायवे हेल्पलाईन ऍम्ब्युलन्समधून इस्लामपूर येथील मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हा अपघात रस्त्याच्या मध्येच झाल्याने बराचवेळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी सेवा रस्त्याचा उपयोग करून वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास पोलिस हवालदार राजेंद्र जाधव करत आहेत. कारचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले, अपघाताची नोंद कासेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car and tractor accident near by neral on pune bangalore national highway