बनावट मालक उभा करुन जमीन विकण्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

हुकूम मुलाणी
रविवार, 15 जुलै 2018

मंगळवेढा : धुळे हत्याकांडामुळे नाथपंथी डवरी समाजावर झालेल्या अन्यायाचा वणवा शांत होण्याआधीच तालुक्यातील गणेश वाडी येथे याच समाजातील शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन बनावट मालक उभा करुन विकण्याप्रकरणी पाच जणाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबतची फिर्याद मनोज इंगोले यांनी दिली.

या घटनेची हकीकत अशी की गणेशवाडी येथील शामराव कृष्णा इंगोले यांचे नावे गट 204 क्षेत्र 1.06 इतकी जमीन आहे. सदरचा मालक भिक्षा मागण्यासाठी नवसार गुजरात येथे गेल्याचे पाहून त्यांच शेतकऱ्यांच्या नावावर गावातील बनावट व्यक्ती उभा करुन 797283569038 या क्रमांकाचे बनावट आधार कार्ड काढण्यात आले. याच आधार कार्डच्या माध्यमातून सदरची जमीन आसबेवाडीत शेतकऱ्याला चार लाख सत्तर हजारात विकण्यात आली. वास्ताविक पाहता मुळ मालकाच्या सातबारा 1980 च्या अगोदर असून बनावट आधार कार्डातील शेतकऱ्यांची जन्म तारीख 1990 आहे. या व्यवहारात साक्षीदार व ओळखदार म्हणून सिध्देश्‍वर जाधव (रा.खोमनाळ, आबासो लांडे,सुनिल चिंचोळे) सचिन लांडे यांनी ओळख व साक्षीदार होण्याचे काम केले. खरेदी देणार असे पाच जनावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुळ मालकाचे नातेवाईक गावात आल्यानंतर त्याला आपली जमिनीची विक्री झाल्याचे समजले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव मारकड करीत आहेत.

Web Title: case file against five people for selling the land by using fake owner