case registered against 16 directors including Vasantdada Sugar Factory president Vishal Patil at Sanjaynagar police station crime marathi news
case registered against 16 directors including Vasantdada Sugar Factory president Vishal Patil at Sanjaynagar police station crime marathi news

वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांविरोधात गुन्हा दाखल

सांगली : सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यातील विक्री केलेल्या मालावर व्यापार्‍यांकडून जीएसटी घेऊन 12 कोटी 44 लाखांची रक्कम राज्य जीएसटी कार्यालयात भरण्यात आलेली नाही. याप्रकरणी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल पाटील, संभाजी मेंढे, मंगल पाटील, शिवाजी पाटील, संपत माने, रणजितसिंह पाटील, सुरेश पाटील, सुनील आवटी, अमित पाटील, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, महावीर पाटील, विक्रमसिंह पाटील, दौलतराव शिंदे, अण्णासाहेब पाटील, जिनेश्वर पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कील यांनी फिर्याद दिली आहे. 

  म्हणून झाला गुन्हा दाखल

2020-21 या वर्षात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या वस्तू व्यापार्‍यांना विकल्या आहेत.त्या व्यापार्‍यांकडून जीएसटीची रक्कमही कारखान्याने घेतली आहे. मात्र ती रक्कम 12 कोटी 44 लाख रुपये आहे. व्यापार्‍यांकडून ती रक्कम घेऊनही राज्य जीएसटीच्या कार्यालयात ती रक्कम न भरल्याने महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमानुसार कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com