प्रथम वर्षाची परीक्षा महाविद्यालयातच ;नियोजन समितीचा निर्णय

First year exams in college education marathi news
First year exams in college education marathi news

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सोमवार (ता. २२) पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा २२ एप्रिलपर्यंत चालतील. मात्र, सर्व अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाची परीक्षा महाविद्यालयांनीच घ्यायची आहे, असा निर्णय आज विद्यापीठ परीक्षा नियोजन समितीने घेतला. यामध्ये प्रश्‍नपत्रिका तयार करणे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करत परीक्षा घेणे ही महाविद्यालयांची जबाबदारी असणार आहे.


विद्या परिषदेच्या सदस्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा नियोजन समितीची बैठक झाली. प्रथम वर्षाची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन होणार आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षेचा कालावधी, त्यासाठीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, आदींबाबत चर्चा करून या समितीने विविध शिफारशी विद्यापीठ प्रशासनाला केल्या. त्यामध्ये महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात. त्यांची प्रश्नपत्रिका तयार करणे आदी जबाबदारी महाविद्यालयांनी पार पाडावी. या बैठकीस डॉ. मेघा गुळवणी, पी. बी. चव्हाटे, एस. बी. भांबर, एच. एन. मोरे उपस्थित होते.

अभ्यासक्रम पूर्ण शिकवावा
कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाले. कमी कालावधीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्‍य नसल्याने परीक्षेसाठी अभ्यासक्रम कमी केला. परीक्षेसाठी जरी अभ्यासक्रम कमी असला तरी शिकवताना पूर्ण अभ्यासक्रम शिकवावा, असेही परीक्षा समितीने सांगितले आहे. हिवाळी सत्रातील परीक्षांप्रमाणे प्रथम वर्षाच्या परीक्षांसाठी ५० गुणांसाठी बहुपर्यायी (एमसीक्‍यू) स्वरूपातील  २५ प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल. 

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com