सावधान : क्रिकेट खेळल्याबद्दल 'त्यांच्यावर' झाला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशाचा भंग केला म्हणून सरकारतर्फे पोलिस नाईक प्रशांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली. 

वाई (जि.सातारा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी क्रिकेट खेळल्याबद्दल सात जणांवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. 

शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी पटेल वाडा येथील मोकळ्या जागेत एकत्र येऊन क्रिकेट खेळत असताना तोंडास मास्क न लावता व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी न घेता हयगयीने बेदरकारपणे मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्‍यात येईल, असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याची घातक कृती करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत असताना आढळून आले.

मुजामल पटेल (वय 24), मोसीम बागबान (वय 19), ताहीर बागबान (वय 19) जाहीद बागबान (वय 20) शहाबाज पठाण (वय 24) आसद सय्यद (वय 19), मोहीम मुजावर (वय 19 सर्व रा. पटेलवाडा, रविवार पेठ) अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत. 

मटण विक्री पडली महागात; जिल्हा प्रशासन सतर्क

त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशाचा भंग केला म्हणून सरकारतर्फे पोलिस नाईक प्रशांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली. 

 

मटण विक्रीसाठी गर्दी केल्याने हिंगनोळेच्या दोघांवर गुन्हा 

उंब्रज (जि.सातारा) ः उंब्रज ते चोरे गावचे हद्दीत हिंगनोळे (ता. कऱ्हाड) येथे रस्त्याकडेच्या मटण दुकानासमोर बोकड कापून लोकांना मटण विक्री करण्याच्या उद्देशाने लोकांची गर्दी केल्याप्रकरणी हिंगनोळे येथील दोन जणांवर उंब्रज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गुलाब अहमद खालिपा, विठ्ठल भिकू सरगर (दोघे रा. हिंगनोळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
पोलिसांची माहिती अशी, उंब्रज ते चोरे गावच्या हद्दीत हिंगणोळे येथे रस्त्याकडेला मटणाच्या दुकानासमोर बोकड कापले. लोकांना मटण विक्रीसाठी लोकांची गर्दी केली. त्याप्रकरणी हिंगनोळे येथील दोघांवर संचारबंदीचा भंग केला. याप्रकरणी गुलाब खालिपा व विठ्ठल सरगर (दोघे रा. हिंगनोळे) याच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद रात्री उशिरा दाखल करण्यात आली आहे. 

अशीही तऱ्हा : कोरोनाशी लढणाऱ्या परिचारिकांची सुरक्षा रामभरोसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Youth For Playing Cricket During Cerfew