Solapur Crime : 'माहेरून आई-वडिलांकडून 50 लाख घेऊन ये'; हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण

सासरी नांदताना घरातील किरकोळ कारणातून सासरच्यांनी छळ केला.
Solapur Crime News
Solapur Crime Newsesakal
Summary

विवाहात हुंडा दिला नाही म्हणून तुझ्या माहेरून ५० लाख आण म्हणून पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ करीत मानसिक त्रास दिला.

सोलापूर : माहेरून तुझ्या आई-वडिलांकडून ५० लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत (Bijapur Police) गुन्हा दाखल झाला आहे. फौजिया इब्राहिम खान (रा. ददापुरे कॉम्प्लेक्स, होटगी रोड) यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Solapur Crime News
Karnataka : काँग्रेस सरकार कोसळणार? सिद्धरामय्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

दरम्यान, सासरी नांदताना घरातील किरकोळ कारणातून सासरच्यांनी छळ केला. विवाहात हुंडा दिला नाही म्हणून तुझ्या माहेरून ५० लाख आण म्हणून पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ करीत मानसिक त्रास दिला. मारहाण देखील केली. विवाहात मानपान नीट केला नाही, हुंडा घेऊन ये म्हणून पती, सासू, दिर, नणंद यांनी जिवे मारण्याची धमकी देखील दिली, असेही फिर्यादीत नमूद आहे.

Solapur Crime News
UPSC Result : शेतकरी बापानं काबाडकष्ट करुन पोराला शिकवलं, पोरानंही पांग फेडलं; 'यूपीएससी'त अक्षयची यशाला गवसणी

नोव्हेंबर २०१९ ते ३ मे २०२३ या काळात सासरच्यांनी खूप त्रास दिल्याचेही फौजिया खान यांनी पोलिसांना सांगितले. यावरून पती इब्राहिम खान, सासू नसीमा इस्माईल खान, नसरीन आरिफ शेख, फातिमा मेहताब मास्टर, आरिफ शेख (सर्वजण रा. नालासोपारा, वेस्ट मुंबई) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार मणुरे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com