मोटारीची काच फोडून लाखाची रोकड लंपास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - मोटारीची काच फोडून त्यातील लाखाची रोकड असलेली बॅग चोरट्याने हातोहात लांबवली. बॅगेत नव्या कोऱ्या नोटा होत्या. गजबजलेल्या शाहूपुरी चौथ्या गल्लीत भर दुपारी ही घटना घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद अनिल विश्‍वनाथ चिवटे (वय 41, रा. चिकुर्डे, ता. वाळवा, सांगली) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अनिल चिवटे यांची वारणानगर येथे "शिवपार्वती रोड लाइन्स' नावाची ट्रान्स्पोर्ट कंपनी आहे. त्यांची कंपनी दुधाची वाहतूक कर्नाटकात करते. आज ते बॅंकेतून पैसे काढण्यासाठी मोटारीतून शाहूपुरीत दुपारी एकच्या सुमारास आले. त्यांच्या सोबत त्यांचा मित्र सुरेश कापरे व चालक हे दोघे होते. त्यांनी आपली मोटार पाचव्या गल्लीत लावली. परिसरातील एका बॅंकेतून एक लाख सात हजारांची रोकड काढली. त्यात चलनात आलेल्या नव्या नोटा होत्या. ती रोकड त्यांनी कागदपत्रे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवली. ती बॅग त्यांनी मोटारीत ठेवली. त्यानंतर चिवटे हे मित्र आणि चालकासोबत शेजारील हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले. दरम्यानच्या काळात चोरट्याने त्यांच्या मोटारीची उजव्या बाजूची काच फोडून त्यातील बॅग हातोहात लंपास केली. जेवण करून परतल्यानंतर चोरीची घटना चिवटे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. चोरीस गेलेली बॅग मार्केट यार्ड परिसरात मिळून आली. त्यात फक्त चिवटे यांची काही कागदपत्रे होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. 

Web Title: cash oneself