'कॅशलेस'साठी "गोकुळ'ची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

अध्यक्ष विश्‍वास पाटील ः ई-पेमेंटची सुविधा असणाऱ्या बॅंकेत उघडणार

कोल्हापूर: केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा सह. दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) मार्फत यापुढे दूध उत्पादकांसाठी कॅशलेस व्यवहाराची मोहीम उघडली जाणार आहे. त्याअंतर्गत प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक दूध उत्पादकाचे खाते जिल्हा सहकारी अथवा राष्ट्रीयीकृत बॅंकेत उघडण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करून त्याद्वारे तसेच संस्था पातळीवर कार्ड स्वाइप करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे सुमारे 100 कोटींहून अधिक पैसे जिल्हा बॅंकेत आहेत. "गोकुळ'कडून दुधाची बिले जिल्हा बॅंकेत जमा केली जातात व तेथून ती संस्थांमार्फत उत्पादकाला दिली जातात. जिल्हा बॅंकेला जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली, त्यानंतर या बॅंकेला चलन पुरवठाही पुरेसा होत नाही. त्यामुळे दुधासह उसाची बिलेही थकली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर "गोकुळ'ने ही मोहीम उघडली आहे. ई-पेमेंटची सुविधा असणाऱ्या बॅंकेत खाते उघडल्यामुळे त्याचप्रमाणे डेबिट/क्रेडिट कार्डची सुविधा दिल्यामुळे संघाच्या प्रत्येक उत्पादकास बॅंक व्यवहाराची माहिती होऊन तो आपले सर्व व्यवहार यापुढे कॅशलेस पद्धतीने करेल. याबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे सर्व प्राथमिक दूध संस्थांना देण्यात आल्या असून प्रत्येक संस्थेने दूध उत्पादकांची खाती ई-पेमेंटची सुविधा असणाऱ्या नजीकच्या बॅंकेत उघडून तसे दूध संघ व शासनास कळविणेचे आहे, अशी माहिती अध्यक्ष विश्वास नारायण पाटील व कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी दिली. याबाबत गोकुळच्या सर्व संलग्न दूध संस्थांनी सहकार्य करून शासनाचा हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलेले आहे.

Web Title: cashless and gokul