शहरात सीसीटीव्हीचा वॉच वाढणार 

डॅनियल काळे
बुधवार, 15 जानेवारी 2020

सुरक्षित शहरासाठी कोल्हापूर महापालिकने सेफ सिटी प्रकल्प चार वर्षापूर्वी राबविला. शहरात 166 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. आता दुसऱ्या टप्यात ही डिजीटल नजर आणखीन वाढविण्याच्यादुष्टीने प्रयत्न असणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. सेफ सिटी प्रकल्पामुळे शहरातील गुन्हे कमी करण्यास मदत होत आहे. 

कोल्हापूर : सुरक्षित शहरासाठी कोल्हापूर महापालिकने सेफ सिटी प्रकल्प चार वर्षापूर्वी राबविला. शहरात 166 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. आता दुसऱ्या टप्यात ही डिजीटल नजर आणखीन वाढविण्याच्यादुष्टीने प्रयत्न असणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. सेफ सिटी प्रकल्पामुळे शहरातील गुन्हे कमी करण्यास मदत होत आहे. 

महापालिकेने चार वषापुर्वी सेफ सिटी हा प्रकल्प राबवायला सुरवात केली. शहरातील प्रमुख मार्ग, प्रमुख चौक अशा 166 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर शहरात 24 तास नजर ठेवली जाते. जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र डिजीटल रुम बसविली आहे. या ठिकाणावरुन शहरातील प्रत्येक चौकावर नजर ठेवण्यात येते. सीसीटीव्ही असणाऱ्या ठिकाणी एखादी घटना घडली तर तात्काळ तेथे पोलिसांना पाठविले जाते. काही महत्वाचे गुन्हेही या सीसीटीव्हीमुळे उजेडात आले आहेत. 
शहरातील चोऱ्यांवरही काही प्रमाणात नियंत्रत ठेवता आले, पण या प्रकल्पाची व्याप्ती आता वाढवायला हवी. तरच शहर सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्यातील या प्रकल्पासाठी सहा ते सात कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 

 

असा असेल दुसरा टप्पा 
सेफ सिटी प्रकल्प टप्पा दोन हा महापालिकेने हाती घेतलेला दुसरा महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात व्हिडीओ सर्व्हीलन्स सिस्टिम,इमर्जन्सी व्हेईकल ट्रकिंग सिस्टिम, पोलिस एम बीट सिस्टीम, टॅफिक एम चलन सिस्टीम, व्हिझीटर इन्फॉरमेशन मॅनेजमेंट सिस्टीम, डायल 100 प्रकल्प राबविणे, सी.टी.ऑपरेशन डॅश बोर्ड याचा समावेश असेल. 

महिलांसाठी असुरक्षीत ठिकाणे 
शहरातील काही ठिकाणी रात्री महिलांसाठी असुरक्षितच आहे. विशेषता सीबीएसकडून पायी रेल्वे क्रासिंग करुन राजारामपूरी, साईक्‍स एक्‍सटेंशनकडे जाण्यासाठी महिला घाबरलेल्या असतात. त्यांच्यासाठी येथे सुरक्षित मार्गच नाही आणि येथे सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. 
त्यामुळे महिलांना येथे असुरक्षित वाटते. रेल्वे कॉसिंग करेपर्यत महिलांच्या जीवात जीव नसतो. परीख पुलातून जातानही महिला असुरक्षितच असतात. येथेही सीसीटीव्ही कॅमेरे आवश्‍यक आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV watch increase in Kolhapur City