मिरवणुकीवर 'सीसीटीव्ही'चे लक्ष; खड्डयाच्या शुल्कावर पदाधिकाऱ्यांचे मौन

CCTVs focus on ganpati rally in sangli
CCTVs focus on ganpati rally in sangli

सांगली : गणेशोत्सवातील मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच छेडछाड, विनयभंगासारखे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथक, दामिनी पथकही तैनात करण्यात येणार आहे. मंडळांना परवाने देण्यासाठी एक खिडकीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

दीनानाथ नाट्यगृह मध्ये सांगली आणि कुपवाड गणेशोत्सव मंडळ यांची बैठकीस महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते युवराज बावडेकर, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपअधीक्षक वीरकर उपस्थित होते. महापौर संगीता खोत यांनी महापालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा सर्वतोपरी सहकार्य करेल. गणेशोत्सव मंडळांनीही जबाबदारीने उत्सव साजरा करावा असे मत व्यक्त केले. नदीत मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने भाड्याने नाव घेऊन माफक शुल्कात उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली. 

आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळांना एक खिडकीमधून सर्व परवानगी सुलभपणे देण्याची सोय करण्यात आल्याची माहिती दिली. उत्सव काळात स्वयंसेवकांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत तरुण कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव विसर्जनावेळी महापालिकेकडून बोट आणि कर्मचारी यांची चांगली व्यवस्था करण्यात येणार आहे, निर्माल्य कुंड व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. 

उपाधीक्षक वीरकर म्हणाले, "गणेशोत्सव काळात पोलिस यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. पोलिस खात्याकडून ऑनलाईन परवानगी देण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व तो प्रयत्न करावा. मोहरम आणि पाचव्या दिवशी गणेश विसर्जन एकाच दिवशीच असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांच्या सूचना पाळून सहकार्य करावे.'' उत्सव काळात नागरिकांसाठी हेल्प लाईन नंबर 1001 आणि 100 असा आहे. उपायुक्त सुनील पवार यांनी आभार मानले. यावेळी सांगली आणि कुपवाडमधील गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
खड्डयांचे कर माफ -
बैठकीत एका कार्यकत्याने खड्डयाचे शुल्क कमी करावे अशी मागणी केली होती. मात्र इतर कार्यकर्त्यांनी खड्डयांचे शुल्क माफ केल्याचे त्याला सांगून गप्प बसवले. परंतु यावर व्यासपीठावरील उपस्थित अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी काही चर्चा केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com