मोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा

राजकुमार शहा 
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 'महिला किसान दिवसाचे' आयोजन मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. त्या वेळी डॉ .वळकुंडे  बोलत होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी, कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी प्रा. दगडू कदम,  राजरत्न जावळे, एकात्मिक बालविकासच्या रजनी सरडगीकर  समता गावडे उपस्थित होते. यावेळी तांत्रिक सत्रांत डॉ.  काजल जाधव यांनी कोरडवाहू शेती समस्या व उपाय योजना या बाबत, डॉ. डी. एन. क्षीरसागर यांनी पोषण परसबागेतील भाजीपाला लागवड या विषयी माहिती दिली. श्रीधर जोशी यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.  डी. पी. बरकडे यांनी हुमणी जीवन चक्राची माहिती देऊन या किडीचा प्रादुर्भाव कालावधी व नियंत्रण तसेच प्रतिबंधात्मक उपाय व घ्यावयाची काळजी याविषयी  मार्गदर्शन केले.

बाल संगोपानाविषयी बालकांचे पोषण व संतुलित आहार या विषयी रजनी सरडगीकर यांनी  महिला शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. ग्रामीण रुग्णालयातील श्रीमती भगत व पाटील यांनी उपस्थित महिला शेतकरी यांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी  रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी तालुक्यातून मोठ्यासंख्येने महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राचे  डॉ किरण जाधव, डॉ ज्ञानेश्वर तांदळे,  नितीन बागल,  अरुण गांगोडे यांनी  परिश्रम घेतले 
 
Web Title: Celebrated Women's Farmer's Day in Mohol